नाशिक मिरर : लासलगाव
श्री संत सेना चॕरीटेबल ट्रस्ट विठ्ठल रुक्मिणी व श्री संत सेना महाराज मंदिर समिती यांच्यावतीने श्री संत सेना महाराज पुण्यतिथी अतिशय मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. पुण्यतिथी उत्सव आटोपल्यानंतर सर्व समाज बांधवांची जनरल मिटिंग घेण्यात आली.

यामध्ये परंपरेनुसार संपूर्ण कामाचा आढावा व विचारविनिमय करण्यात आला. त्यानंतर लासलगाव शहर अध्यक्ष तुषार जगताप यांच्या अध्यक्षतेखाली 2021-22 या वर्षाकरता करता शहराध्यक्ष म्हणून अभिजीत जगताप यांची व उपाध्यक्ष म्हणून संदीप कदम यांची एकमताने निवड करण्यात आली.

यावेळी उपस्थित सर्वांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करून मावळते अध्यक्ष तुषार जगताप यांनी याचा सत्कार केला व पुढील वर्षाचा कारभार अभिजित जगताप यांच्याकडे सुपूर्त केला.

या पुढील येणाऱ्या कार्यकाळात जास्तीत जास्त मंदीराची व समाजाची सेवा करण्याचे आश्वासन अभिजित जगताप व संदीप कदम यांनी आपल्या मनोगतात व्यक्त करुन आश्वासन दिले. व उपस्थित सर्व समाज बांधवांच्या वतीने या अभिनंदन करण्यात आले व त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

बातम्या

Don`t copy text!