नाशिक मिरर : सातपूर औद्योगिक वसाहती मध्ये चोरट्यांचा धुमाकूळ दिसून येत आहे. सोमवारी पहाटे तीन वाजेनंतर सातपूर भागातील सावरकरनगर, निलंकठेश्वरनगर व
अशोकनगरच्या मुख्य रस्त्यावर भुरट्या चोरांनी दुचाकी, कपड्याचे गोडाऊन व पेट्रोल चोरी केल्या असल्याचे समोर आले आहे. भुरट्या चोरांचा सातपूर भागात सुळसुळाट झाला असल्याने कामगारनगरी भयभीत झाली आहे. दरम्यान घटनेची
माहिती सातपूर पोलिसांना मिळताच त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज बघून तपास सुरू केला असल्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक किशोर मोरे यांनी सांगितले.

घटनास्थळाची पहाणी वरिष्ठ पोलिस निरिक्षक मोरे यांच्यासह अधिकारी व कर्मचा-यांनी केली.अशोकनगर रस्त्यालवरील सावकरनगर भागात असलेल्या साई कलेक्शन येथील दुकानावर असलेले गोडाऊनच्या दरवाजाचे कडी-कोयंडा तोडत गाऊन व शर्ड असा २० हजारांचा माल चोरट्यांनी लंपास केला. संबधित भुरट्या चोरट्यांचा अवतार
सीसीटीव्हीत कैद झाला आहे. तसेच निलकंठेश्वरनगर येथील थोरात पार्क येथील चोरट्यांनी दुचाकीतील पेट्रोल चोरले. तसेच दोन दुचाकी चोरण्याचा प्रयत्नही केला. परंतू दोनही दुचाकी सुरूच झाल्या नसल्याने त्यांनी त्या सोडत पयालन केले. यात एका बंद घराचे कुलूप तोडत चोरटे तब्बल अर्धा तास तळ
ठोकुन होते. बंद घरात काहीही नसल्याने फर्निचरचे नुकसान चोरट्यांनी केले. यानंतर सावकरनगरच्या महिंद्रा कंपनीच्या भिंतीलगत असलेल्या भागातही चोरट्यांनी दुचाकी पळविली. तसेच इतर वाहनातील पेट्रोलही चोरले. यावेळी बुलेट दुचाकी सुरूच होत नसल्याने रस्त्याच्या बाजूला लावत पळुन गेले.
संबधित सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून तपास सुरू केले असल्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक मोरे यांनी सांगितले. एकाचवेळी तीन ते चार ठिकाणी गृपने चोरट्यांनी संधी साधली असावी असा अंदाज पोलिसांनी
व्यक्त केला. चोरट्यांचा एक मोठी टोळी सदर चोऱ्या करीत असल्याचे दिसून येत आहे. याबाबतही सातपूर पोलिस
अधिक तपास करीत आहे.

 

Don`t copy text!