नाशिक मिरर : नवीन नाशिक येथील संभाजी स्टेडियम व ठक्कर डोम येथे कोरोना कक्ष कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने आयुक्त कैलास जाधव यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करून त्या ठिकाणी विविध प्रकारच्या कामाच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या.
नाशिक महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून या पार्श्वभूमीवर शहरातील रुग्णांना बेडची संख्या अपुरी पडू नये या दृष्टीने मनपाच्या वतीने युद्धपातळीवर कामकाज सुरू असून त्यामध्ये कोरोना कक्षाच्या संख्येत वाढ करून त्यात बेडची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात आहेत.या पार्श्वभूमीवर नवीन नाशिक संभाजी स्टेडियमच्या जागेत सुमारे २०० रुग्णांची व्यवस्था होईल असे नियोजन करून या कामास गती देऊन तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्या.तसेच ठक्कर डोम येथील कोरोना कक्ष त्वरित सुरू होईल या दृष्टीने पाहणी करून क्रेडाईचे पदाधिकारी सचिन बागड, रवी महाजन, कुणाल पाटील व अनिल आहेर यांच्याशी आयुक्त कैलास जाधव यांनी चर्चा केली.यावेळी आयुक्त कैलास जाधव यांचे समवेत उपायुक्त मनोज घोडे पाटील, सहाय्यक संचालक नगर रचना अंकुश सोनकांबळे, अधीक्षक अभियंता संदीप नलावडे, चव्हाण की कार्यकारी एस.एम.चव्हाणके, कार्यकारी अभियंता राजू आहेर, घनकचरा व्यवस्थापन संचालिका कल्पना कुटे, विभागीय अधिकारी मयुर पाटील व आदी अधिकारी उपस्थित होते.
