नाशिक मिरर वेबटीम : नाशिक शहरात व सातपूर परिसरात रोजच कोविड संसर्गाने रुग्ण संख्या वाढत असून संसर्गाने रुग्ण बाधित होत आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघातील सातपूरमध्ये श्रमिक नगर, अशोक नगर, जाधव संकुल या परिसरात मोठ्या संख्येने नागरिक राहत असून या परिसरातील नागरिकांना शहरातील हॉस्पिटलमध्ये जावे लागते.
सदर कोविड सेंटर मध्ये रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.तसेच त्या ठिकाणी बेड उपलब्ध होत नाही. सातपूर परिसरात मोठी असे सेंटर नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी व सातपूरकरांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याशी चर्चा करून सातपूर येथील इएसआय रुग्णालय येथे कोविड सेंटर चालू करण्याची मागणी केली आहे. जिल्हाधिकारी यांनी लवकरच ईएसआय रुग्णालय येथे कोविड सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.
