नाशिक मिरर : त्र्यंबकेश्वर नगरपालिकेमध्ये त्र्यंबकेश्वर नगरी स्वच्छ करण्यासाठी असणारे स्वच्छता कर्मचारी यांना त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या जुने कॉन्ट्रॅक्टरने काम सोडल्यामुळे नगरपालिकेने नवीन कॉन्ट्रॅक्टर अपॉईंट केले आहे व त्याला फक्त तीस ते चाळीस कामगारांना कामावर घेण्यास सांगितले आहे. कोरोना सारख्या महामारी मध्ये ज्या लोकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता स्वच्छतेचे काम केले, त्रंबकेश्वर ची स्वच्छता केली त्याच कामगारांना आता मात्र कामावरून काढून टाकायचा कट त्र्यंबकेश्वर नगरपालिका करत आहे. मात्र हे सर्व ६० कर्मचारी प्रहार वर्कर्स युनियनचे सभासद आहेत. कर्मचारी साठी मागच्या वर्षी अर्ध दफन आंदोलन केलं होते. आणि या वेळेला कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार असेल तर प्रहार वर्कस यनियनच्या वतीने पूर्णदफन आंदोलन करण्याचा इशारा प्रहार वर्कर्स युनियनचे अध्यक्ष अनिल भडांगे यांनी त्र्यंबकेश्वर नगरपालिकेला दिला आहे.
यावेळी जिल्हा प्रमुख अनिल भडांगे, सरचिटणीस नितीन गवळी, जिल्हा संघटक दिलीप पाटील, शहर संघटक संजय तिवडे, नानासाहेब दोंदे, विजू गोयर, राम दोंदे, सुभाष शेळके तसेच त्र्यंबकेश्वर स्वच्छता कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
