लसीचे दोन्ही डोस घेऊन देखील बाधित
दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात उत्कृष्ट नियोजनाव्दारे कोरोनाचा प्रार्दुभाव कमी करण्याची महत्वपूर्ण कामगिरी
 नाशिक मिरर : 
कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही  डोस घेतलेले नाशिकचे लोकप्रिय जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना  कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यांची कोरोना चाचणी अहवाल  पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासन चिंतीत आहे. एक कर्तबगार व कर्तव्यनिष्ठ प्रशासकीय अधिकारी म्हणून सूरज मांढरे यांची ख्याती आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या प्रार्दुभाव आटोक्यात आणण्यासाठी मांढरेंनी विविध उपाययोजना व खबरदारीची जनजागृती नागरिकांत करुन जिल्ह्याला कोरोना मुक्त करण्याचा विशेष प्रयत्न वाखण्याजोगे आहे. एकीकडे कोरोनाशी लढा व दुसरीकडे प्रशासकीय कामे दोन्ही बाजु  समर्थपणे त्यांनी पेलली त्यामुळे शासकीय कामे प्रलंबित न ठेवता ती पूर्णत्वास नेली यामुळे सर्व शासकीय सेवा नागरिकांना वेळेत उपलब्ध झाली. कोणतेही शासकीय कामासाठी नागरिकांना त्यांची भेट सुलभतेने होत. कधीही अडवणूक झाली नाही ऐवढेच काय तर त्यांना फोन अथवा संदेशव्दारे अडचणी कळवितात त्याची दखल तत्काळ होवून निराकरण करून देण्यास जिल्हाधिकारी सूरज मांढरे तत्पर असतात. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची अडीअडचणी क्षणात मार्गी लावण्यासाठी त्यांची कार्यपद्धती ल कार्यप्रणालीने अल्पवधीतच लोकप्रिय जिल्हाधिकारी म्हणून त्यांची ख्याती बनली.
गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व आपत्ती व्यवस्थापन
प्रमुख या नात्याने  सूरज मांढरे यांनी कोरोना महामारी प्रतिबंधासाठी महत्वपूर्ण नियोजनबद्ध पध्दतीने आपली
जबाबदारी पार पडत कोरोना बरोबरच म्युकरमायसिस आजाराच्या अटकावसाठी अहोरात्र परिश्रम घेत  आजाराला नियंत्रणात ठेवण्यात यश मिळविले. कोरोनाच्या पहिल्या लाटेत हाहाकार उडालेल्या
मालेगाव शहरात  जिल्हाधिकारी  सूरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकाऱ्यांनी व शासकीय
यंत्रणांनी उत्कृष्ट नियोजन करत या आजाराचा प्रादुर्भाव अत्यंत कमी करुन निच्चांक पातळीवर आणला तसेच
नाशिक शहर व ग्रामीण भागातील कोविड रुग्णांना वेळेत आॅक्सिजन, खाटा, व्हेंटीलेटर, रेमडिसिव्हर इंजेक्शन आदी
उपलब्ध करून देण्यात अग्रेसर राहुन सूरज मांढरे यांची कार्यपद्धती मोलाची ठरली.
यशस्वीपणे सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच सूरज मांढरे यांना कोरोनाचा संसर्ग होवून ते कोरोना पॉझिटिव्ह झाले. कर्तबगार,कर्तव्यनिष्ठ कर्तव्यदक असा विविध उपादी मिळालेल्या प्रशासकीय सेवेतील या लोकप्रिय अधिकारी जिल्हाधिकारी सूरज मांढरे कोरोनावर मात करून लवकरात लवकर पूर्णपणे बरे होवुन त्यांना पुन्हा आरोग्यदायी व उदंड आयुष्य लाभो…

बातम्या

Don`t copy text!