नाशिक मिरर : 
पंचवटीतील जुन्या आडगांव नाक्याजवळील बंद गाळ्यासमोर अंदाजे तीस ते पस्तीस वयोगटातील एका युवकाची अज्ञात मारेकर्‍यांनी गळा चिरून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांच्या हाती रात्री उशिरापर्यंत कोणतेही धागेदोरे लागले नसल्याने मृत युवकाचे नावही समजू शकलेले नाही.

1घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सदर युवकास उपचारासाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वीच तो युवक मृत झाल्याचे समजते. काट्या मारुती पोलिस चौकीजवळच रात्री उशिरा ही घटना घडली असून, त्याप्रसंगी चौकीतील पोलिस काय करीत होते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलिस उपायुक्त अमोल तांबे, सहायक पोलिस आयुक्त मधुकर गावित, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे व गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ही हत्या कोणी व कोणत्या कारणाने हे रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. पुढील तपास पोलिस करीत आहेत. दरम्यान, हत्या झालेला युवक हा जुना आडगाव नाका ते वाघाडीपर्यंत जखमी अवस्थेत पळत गेला आणि रस्त्यातच रक्ताच्या थारोळ्यात पडला अशीही चर्चा रंगली होती.

बातम्या

Don`t copy text!