नाशिक मिरर : म्हसरूळ प्रतिनिधी

गणेशोत्सवाला येथे अपार उत्साहात सुरूवात झाली. गणपती बाप्पाला घरी आणताना नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. येथील बसस्थानक भागासह सर्वत्र गणेश मूर्ती व पूजाविधीच्या वस्तूच्या दुकानांत गर्दी होती. मिठाईच्या दुकानांत गोडधोडाची मोठी खरेदी झाली. येथील एका मिठाई विक्रेत्याने तब्बल 11 रंगांत 13 प्रकारचे मोदक तयार केले आहेत. गणेश भक्तांनीही खरेदी करून या नाविन्यपूर्ण मोदकांना चांगला प्रतिसाद दिला.

म्हसरूळ गावातील बसस्थानक परिसर, शिवाजी चौक, संभाजी चौक, मारूती मंदिर परिसरासह गुलमोहरनगर, शिवाजीनगर, स्नेहनगर, स्वातंत्र्यवीर सावरकरनगर, रिलायन्स चौक परिसर, गोरक्षनगर, कलानगर, पोकार काॅलनी आदी भागात नागरिकांनी मोठ्या आनंदाने गणरायाला घरी आणले.

नागरिकांनी घरगुती मोदकासह तयार मोदक खरेदीसही महत्त्व दिले. म्हसरूळ बसस्थानक परिसरातील बँक ऑफ इंडिया शेजारील शांतालक्ष्मी अपार्टमेंटमधील `अभिषेक मिठाई’ने 11 रंगांत 13 प्रकारचे मोदक तयार केले होते. हे मोदक मलई फ्लेवर, रोझ, अननस, चाॅकलेट, कोकोनट, आंबा, केशर, पिस्ता, ऑरेंज रेड, काजू, कंदी, काजू-केशर, गुलकंद व उकडीचे या प्रकारांत बनविले आहेत. हे मोदक खव्यापासून बनविले आहेत. असे वैशिष्ट्यपूर्ण मोदक खरेदीसाठी नागरिकांनी अभिषेक मिठाईत गर्दी केली होती. या दुकानाचे मालक अभिषेक महाले व गंगाधर महाले आहेत. 16 जून 2020 ला या दुकानाचा शुभारंभ केला आहे.

ग्राहकांची पसंती हेच आमचे ध्येय आहे. गुणवत्तापूर्ण व चवदार पदार्थ आम्ही तयार करतो. त्याला ग्राहकही भरभरून प्रतिसाद देतात.
अभिषेक महाले, प्रोपायटर – अभिषेक मिठाई.
  

बातम्या

Don`t copy text!