नाशिक मिरर वेबटीम : दिनांक १७ डिसेंबर रोजी सकाळी कुमारी रोशनी केदारनाथ जयस्वाल ( वय २२ वर्ष रा.कामगार नगर )या युवतीचा औद्योगिक वसाहती मधील ग्लेनमार्क कंपनीसमोर पोलीस भरतीचा सराव करत असताना रोशनीचा मनपाच्या टोचन केलेल्या घंटागाडी खाली येऊन रोशनीच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तिच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदरची घटना अतिशय दुःखद गंभीर स्वरूपाचे आहे.त्यामुळे सिडको-सातपूर मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांनी रोशनी च्या कुटुंबातील आई-वडील व इतर सदस्य यांची भेट घेऊन सांत्वन केले.व आर्थिक मदत मिळवून देऊ असे आश्वसन दिले.यावेळी भाजपा चे रामहरी संभेराव , अमोल इंगे,संदीप काळे आदी उपस्थित होते.घंटागाडी चालक यांच्या निष्काळजीपणामुळेच सदर घटना घडली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रोशनी जयस्वाल यांच्या मृत्यूची चौकशी करून संबंधित मक्तेदारी एजन्सीवर त्वरित कारवाई करण्यात यावी. सदर ठेकेदाराला देण्यात येणाऱ्या रकमेतून पाच लाख रुपये कपात करून रोशनी हीला आर्थिक नुकसानभरपाई देण्यात यावी. घनकचरा व्यवस्थापन विभागाने या घटनेची माहिती जाणून बुजून दडवून ठेवली असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेतील अधिकारी व ठेकेदार यांचे लागे- बंद असल्याचे या निमित्ताने उघडकीस आल्याचे दिसून येते. ठेकेदाराला पाठीशी घालण्यासाठी घटना आपणापर्यंत पोहोचलेली नाही. संबंधित मक्तेदार एजन्सी च्या घंटागाड्यांची तपासणी आरटीओ विभागाकडून वेळोवेळी होणे आवश्यक आहे. शहरात अनेक ठिकाणी अरुंद रस्ते असतात, गर्दीची वर्दळ असते, अशावेळी उतारावर घंटागाडी नादुरुस्त झाल्यास अजून अपघात घडून जीवितास धोका होण्याची शक्यता आहे.त्यामुळे घंटागाडीची आरटीओ व मनपा यांत्रिक विभागाकडून तपासणी होणे आवश्यक आहे.असे पत्रात नमूद केले आहे.व रोशनीच्या कुटुंबाला ५ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी आमदार सीमा हिरे यांनी पत्राद्वारे नाशिक मनपा आयुक्त यांच्याकडे केली आहे.
