नाशिक मिरर वेबटीम : प्रभाग क्रमांक १० मधील प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांची लवकरात लवकर सोडवणुक करावी.अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनपा विभागीय अधिकारी नितीन नेर यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की जाणता राजा ग्राउंड येथील लवकरात लवकर मार्केट बांधणे,अंबिका स्वीट ते मौले हॉल रस्ता रुंदीकरण व दुभाजक करणे,पावसाळ्यात साचत असलेल्या पाण्याचा बंदोबस्त करणे,प्रभाग क्रमांक १० मधील खाजगी मोकळ्या भुखंडावर वाढलेल्या गवत काढणे,निळकंठेश्वर मंदिरासमोरील राज्यश्री पार्क रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करणे, कातकाडे नगर येथील नियोजित हॉस्पिटल चे गेल्या दहा वर्षापासून रखडलेले काम सुरू करणे,बागुल ड्रायव्हिंग स्कुल ते त्रंबक रोड दरम्यानचे रस्त्याचे डांबरीकरण करणे,प्रभाग क्रमांक १० मधील मिनि थिटीअर उभारणे,प्रभाग क्रमांक १० मध्ये महिलांसाठी स्वतंत्र व्यायाम शाळा उभारणे, समृद्धी नगर त्रंबक रोड ते अशोक नगर श्रमिक नगर पर्यंत दुभाजक बसविणे,मौले हाँल ते अंबिका स्वीट येथील रस्त्यामध्ये गटार योजनेमुळे मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत.त्याची चौकशी करावी.आदी मागणीचे निवेदन देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे,विभागीय अध्यक्ष जीवन रायते,युवक विभागीय अध्यक्ष निलेश भंदुरे,कार्याध्यक्ष समाधान तिवडे,सरचिटणीस विकास सोनवणे,नितीन कल्पेश कांडेकर ,नंजय रहाणे,दत्ताजी वामन अनिस शेख,अमोल भावले,संजय वाघमारे,सचिन उशीर,विकास सोनवणे,अरुण भोसले,शिवाजी मटाले,किरण शिंदे,गणेश भावले,महेश जाधव आदीसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!