इंडील्युब साठी मोठी व्यवसाय संधी उपलब्ध

नाशिक मिरर वेबटीम : नाशिकमधील ऑईल उत्पादक कंपनी इंडील्युब आणि बिहारमधील बायो डिझेल मध्ये अग्रगण्य कंपनी जी. बी. एफ. इंडिया यांच्या मध्ये नुकताच सामंजस्य करार करण्यात आला.या करारा अंतर्गत संपूर्ण पूर्व रिजन मधील राज्य ज्यामध्ये बिहार, झारखंड, ओरिसा, प. बंगाल, आसाम आणि उत्तर प्रदेश यांचा समावेश आहे. या राज्यांत जी. बी. एफ. इंडिया च्या सर्व डिझेल पंप तसेच वितरण व्यवस्थाद्वारे इंडील्युब ब्रॅंड चे इंजिन ऑईल ,गियर ऑईल आणि इतर सर्व उत्पादने वितरित करण्यात येणार आहे. नाशिक मधील कंपनी या कराराद्वारे आता लवकरच आपला विस्तार पूर्व भारतात करणार असल्याचे कंपनीचे संचालक सागर सोनवणे यांनी नमूद केले. इंडील्युब ही मोठ्या प्रमाणावर शासकीय संस्थामध्ये पुरवठादार कंपनी असून इंडील्युब ची ऑफिसेस ही आता रांची, पटना, भुवनेश्वर येथे सुरू होणार आहेत. यामुळे २५ हून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. असे प्रतिपादन संजय सोनवणे यांनी नमूद केले. झारखंड आणि बिहार येथील खाण तथा खनिज उद्योगांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व मशिनसाठी लागणारे ऑइल तथा ग्रीस यासाठी मोठ्या व्यवसाय संधी इंडील्युब साठी उपलब्ध होणार आहे. असे विठ्ठल माहुलीकर यांनी संगितले.या करारा प्रसंगी जी बी एफ इंडिया चे संचालक हर्षिकेश कुमार व क्षितिज पांडे, इंडील्युब च्या शितल ठाकरे, स्वप्नाली डेमसे आणि पूजा आस्मार इत्यादी उपस्थित होते.

 

 

Don`t copy text!