नाशिक मिरर : नाशिक औद्योगिक वसाहतीतिल मदर इंडस्ट्री असलेल्या महिंद्रा अँन्ड महिंद्रा कंपनीत कामगारांना भरघोस लाखो रुपये बोनस जाहीर झाला आहे. महिंद्रा अँन्ड महिंद्रा एम्प्लॉइज युनियन व व्यवस्थापन यांच्यात झालेल्या यशस्वी चर्चेनंतर कायम २ हजार १०० कामगारांना या वर्षी ५५ हजार ते १ लाख १२ हजार ३०० चोवीस रुपये बोनस सेवा जेष्ठतेनुसार मिळणार आहे.कोरोना काळ व ऑटोमोबाईल क्षेत्रात असलेल्या मंदीच्या काळातही व्यवस्थापन व युनियन यांच्यातील चर्चेने सर्वाधिक बोनस दिल्याचा दावा युनियन ने केला आहे.महिंद्रा च्या बोनस कडे औद्योगिक क्षेत्रातील सर्वांचे लक्ष लागून होते.बोनस बरोबर पगार ची रक्कम ही एकत्र मिळणार असल्याने कामगारात तसेच कुटूंबातही आनंदाचे वातावरण आहे. युनियन तर्फे अध्यक्ष एन. डी. जाधव,संजय गुघे, उपाध्याय, संजय घोडके जनरल सेक्रेटरी, जितेंद्र सूर्यवंशी सेक्रेटरी,अजित थेटे जॉईंट सेक्रेटरी,सचिन मोरे,खजिनदार,प्रकाश माळी कमेटी मेंबर (अ)संतोष सावकार कमेटी मेंबर( ब)यांनी व्यवस्था पणबरोबर यशस्वी चर्चा केली.

बातम्या

Don`t copy text!