नाशिक मिरर वृत्तसेवा :
वाडीवा-हे औद्योगिक वसाहती मधील फॅब कंपनीतील कामगारांनवर करण्यात आलेला पोलिसांचा लाठीचार्ज व दडपशाही च्या निषेधार्थ जनवादी महिला संघटनेच्या वतीने पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत निदर्शने करण्यात आली.
फॅब कामगारांना मारहाण करणाऱ्या वरीष्ठ पोलीस अधिकारी व वाडीव-हे पोलीसांना निलंबित करा. तसेच कामगारांना कंपनीत मारहाण करणाऱ्या मालकाला अटक करा. या मागण्यांचे निवेदण देण्यात आले. तसेच पोलीस दडपशाही चा निषेध करण्यात आला.निवेदनात कंपनीवरील युनियनचा बोर्ड व झेंडा काढणा-या पोलिसांनवर गुन्हा दाखल करुन निलंबित करा.फॅब कंपनीतल कमी केलेल्या कामगारांना पुर्ववत कामावर घेण्यात यावे.कॉ देविदास आडोळे वरील काडलेली हदपार नोटीस मागे घ्या. अशी मागणी ही करण्यात आली.
या वेळी सिटू राज्य उपाध्यक्ष कॉ सीताराम ठोंबरे जनवादी महीला संघटणेच्या अध्यक्ष कॉ शिंदु शार्दूल मोहन जाधव, दत्ता राक्षे,कांतीलाल गरुड , मच्छिंद्र गतीर , निवृती कडु, कल्पना शिंदे, विजया टिकल मनोज भोर , भाउसाहेब जाधव, रमेश डोंगरे, रामदास चारसकर,ज्ञानेश्वर काजळे, गौतम कोंगळे, संध्या जोशी सह महिला कामगार व उपस्थित होते.
