शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार : आमदार कोकाटे

सर्वतीर्थ टाकेद : नाशिक मिरर प्रतिनिधी इगतपुरी तालुक्यासह पूर्व भागातील टाकेद खेड गटात अगोदरच करपा,मावा,तुडतुडा रोगाने भात पीक वाया गेलेले असतांनाच अश्या भयावह परिस्थितीत मधेच अवकाळी अतिवृष्टी सारखे अस्मानी संकटाने शेतकऱ्यांच्या मुळावर घाव घातला आणि या परतीच्या वाऱ्या वाहुधांनासह झालेल्या अवकाळी  अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे उभे असलेले हाता तोंडाशी आलेले पीक पावसाने आडवे पडून भुईसपाट झाले. जमीनदोस्त झालेली भात पिके संपुर्ण उध्वस्त झाल्याने या संकटात शेतकऱ्यांचे अतोनात मोठे नुकसान झाले. अगोदरच कोरोनाने होरोपळून उसनवारी कर्जबाजारी करून दुबार पेरणीसह केलेली भात शेती कशीबशी जगवली त्यात करप्या रोगाने घाव घातला आणि नियतींलाही ते मान्य होते की काय मधेच अतिवृष्टी ढगफुटी होते व परतीच्या अवकाळी पावसामुळे सर्व उभे पीक काही दिवसांतच नष्ट होते. या परिस्थितीमूळे शेतकरी वर्ग पूर्णपणे खचला आहे. त्यामुळे सरसकट पंचनामे करून तातडीने जास्तीत जास्त नुकसानभरपाई आणि आणेवारी सह सरकट पीक विमा द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी आमदार कोकाटे यांच्याकडे केली. शासनाकडे आपण पत्रव्यवहार केला असून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई,आणेवारी व पीक विमा कंपन्यांकडून विमे मिळवण्यासाठी पाठपुरावा करू,१० हजार कोटी रुपयांच्या पॅकेज मध्ये शेतकऱ्यांची नुकसानभरपाई पूर्ण होणार नाही मी स्वतः मुख्यमंत्री, कृषी मंत्री यांच्यासह शासनाकडे पत्रव्यवहार करून जास्तीत जास्त नुकसान भरपाईची पत्रव्यवहार करून मागणी करणार आहे.अशी ग्वाही आमदार कोकाटे यांनी टाकेद गटातील अतिवृष्टी नुकसान पीक पाहणी दौऱ्या प्रसंगी शेतकऱ्यांना दिली. आमदार कोकाटे यांनी पिंपळगाव मोर,धामणी,बेलगाव,धामणगाव, अडसरे,टाकेद,अधरवड,वासाळी,निनावी,सोनोशी,बारशिगवे,इंदोरे,खडकेद,भरविर आदींसह वाड्या वस्त्यांमधील भगत (ता.२४). नुकसानीची पाहणी केली.या भात पीक नुकसान पाहणी दौऱ्यात आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासह इगतपुरीचे नायब तहसीलदार पी डी गोंडाळे, कृषी अधिकारी शितलकुमार तंवर,सहाय्यक गट विकास अधिकारी भरत वेंदे,जेष्ठ नेते रतन जाधव,तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे,मा.उपसभापती पांडुरंग वारुंगसे, गट नेते वसंत भोसले,मा.जि प सदस्य केरु खतेले,रामदास वाजे,महेश गाढवे,सरपंच काशिनाथ कोरडे,जनार्धन शेने,सामजिक कार्यकर्ते राम शिंदे,गोविंद जाधव,नारायण भोसले,अनिल वाजे,दौलत बांबळे, संतोष साबळे,स्वीय सहाय्यक संजय डावरे,शिवा वाणी आदींसह सर्व गावचे सरपंच,ग्रामसेवक,तलाठी,मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्यासह महसूल विभाग,कृषी विभाग,पंचायत समिती पदाधिकारी यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते.

“वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या भात पिकांचे पूर्णतः नुकसान झाले असून नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई आणि आणेवारी सह पीक विमे मिळविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.”
– आमदार माणिकराव कोकाटे , सिन्नर-इगतपुरी विधानसभा मतदार संघ

फोटो : टाकेद गटात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भात पिकांची पाहणी करतांना आमदार माणिकराव कोकाटे,तहसीलदार पी डी गोंडाळे, कृषी अधिकारी शितलकुमार तंवर,रतन जाधव,पांडुरंग वारुंगसे,महेश गाढवे,रामदास वाजे,वसंत भोसले आदीं पदाधिकारी शेतकरी वर्ग. (छायाचित्र)  : रमेश पांडे

बातम्या

Don`t copy text!