सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांची समाजसेवा
नाशिक मिरर : टाकेद बु सरपंच ताराबाई रतन बांबळे यांच्यासह गावातील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते सोशल डीस्टन्सिंग ठेवत अंगणवाडी सेविकांना केले स्टॅम्प इंक पॅड चे वितरण करण्यात आले. ग्रामपंचायत टाकेद बु येथील अंगणवाडी क्रमांक ३ मध्ये अंगणवाडी सेविकांची मीटिंग झाली.याचे औचित्य साधत टाकेद येथील सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांनी सामाजिक कार्यकर्ते रतन बांबळे यांच्या संकल्पनेतून टाकेद येथील आठ अंगणवाडी सेविकांना स्टॅम्प आणि इंक पॅडचे स्वखर्चाने वाटप केले.गेल्या अनेक वर्षांपासून टाकेद येथील अंगणवाडी सेविकांना स्टॅम्प इंक पॅड नव्हते या प्रश्ना अभावी अंगणवाडी सेविकांना ग्रामपंचायत स्तरावर अंगणवाडीतील लहान मुलांच्या नवीन आधार कार्ड समस्या यांसह या अंगणवाडीतील विविध प्रश्न निवेदनाद्वारे शासनस्तरावर मांडण्यासाठी व विविध कामाची मागणी करण्यासाठी स्टॅण्ड मिळत नव्हते या कारणास्तव अंगणवाडी सेविकांची विविध प्रश्नांवाचून गैरसोय होत होती याची दखल टाकेद येथील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार राम शिंदे यांनी दखल घेतली व आपल्या स्वखर्चातून टाकेद येथील सर्व अंगणवाडी सेविका,आरोग्य सेविका यांच्यासह रेशन दुकानदार यांचे शिक्के व इंक पॅड बनवून घेतले व आज अंगणवाडी सेविकांच्या मीटिंग दरम्यान टाकेद येथील अंगणवाडी क्रमांक ३ मध्ये टाकेद गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ ताराबाई रतन बांबळे यांच्यासह जेष्ठ नागरिक रमेश पाटील वारुंगसे,पुरोहित रमेश बेलगावकर,सामाजिक कार्यकर्ते रतन बांबळे,आरोग्य सेविका बी एन सोनवणे,टाकेद अंगणवाडी बिटाच्या पर्यवेक्षिका पूर्वा दातरंगे यांच्या हस्ते सुरक्षित अंतर ठेवत सर्व अंगणवाडी सेविकांना स्टॅम्प इंक पॅड चे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सर्व टाकेद परिसरातील टाकेद बिटातील अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.अंगणवाडी सेविकांना स्टॅम्प आणि इंक पॅड चे वाटप केल्याने सर्व अंगणवाडी सेविकांनी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार राम शिंदे, ग्रामपंचायत सरपंच ताराबाई रतन बांबळे यांचे आभार मानले टाकेद सह टाकेद बिटातील सर्व गावच्या अंगणवाडी सेविकांना शिक्के आणि स्टॅम्प पॅड चे वाटप केल्या जाईल असे प्रतिपादन रतन नाना बांबळे व राम शिंदे यांनी केले. इगतपुरी पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी भरत वेंदे यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाचे सुत्रांचालन अधरवड येथील उत्कृष्ट अंगणवाडी सेविका मंगल डोळस यांनी केले तर आभार प्रदर्शन अंगणवाडी पर्यवेक्षिका पूर्वा दातरंगे यांनी केले.
