पेेठ : नाशिक मिरर
पेठ तालुक्यातील होमपाडा येथील तरुण शेतकरी सोमनाथ अशोक चौधरी ( २८) यांचा शेतात काम करत असतांना सर्पदंशाने मृत्यू झाला. सोमनाथ हे स्वत:च्या शेतात काम करीत असतांना दुपारच्या सुमारास विषारी सर्पाने दंश केला असता त्यांना तात्काळ हरसुल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अकस्मात मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत असुन सोमनाथ यांच्या पश्यात पत्नी आई वडील भाऊ बहीण असा परिवार असुन त्यास दहाच दिवसापुर्वी पुत्ररत्न झाले आहे. या आनंदात असतांनाच त्याच्यावर काळाने घाला घातल्याने एका तरुण शेतकऱ्यांच्या मृत्यूने होमपाडा गावावर शोककळा पसरली आहे.हरसुल येथील ग्रामीण रुग्णालयात मयताचे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
