दोन संशयिताना अटक

धुळे : नाशिक मिरर वृत्तसेवा

शिरपुर तालुक्यातील कळमसरे गावात एका घरात बनावट नोटा तयार करण्याचा मिनी कारखाना उध्दवस्त करण्यात आला असुन याप्रकरणात दोघांना बेडया ठोकण्यात आल्या आहेत. या टोळक्याने स्कॅनरच्या मदतीने तयार केलेल्या या नोटा चलनात आणल्याचा संशय असुन अशा नोटा आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत यांनी केले आहे.
शिरपुर तालुक्यातील कळमसरे गावात गांजाची तस्करी समवेतच बनावट नोटांचे रॅकेट सुरु असल्याची माहीती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी ही माहीती पोलिस अधिक्षक पंडीत व अपर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव यांना दिली. यादरम्यान धुळयात ॲक्सीस बँकेच्या आरोपींची चौकशी सुरु असल्याने त्यांनी शिरपुर पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंत पाटील यांना ही माहीती कळवली. यानंतर हेमंत पाटील यांनी शिरपुर व स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचारींच्या मदतीने कळमसरे येथील संशयीत घरावर छापा टाकला. पोलिसांचा छापा पडल्याचे पाहुन एका व्यक्तीने बेसीनमधे कागदांचा साठा जाळण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिस बेसीनजवळ पोहोचुन कागदाची आग विझवली असता त्यात भारतीय बनावटीच्या 200 रुपयांच्या बनावट नोटा आढळुन आल्या. त्यामुळे पथकाने गुलाब बेलदार नावाच्या या व्यक्तीस ताब्यात घेवुन घराची झडती घेतली असता या घरात संगणक संच , रंगीत स्कॅनर , नोटा तयार करण्यासाठीचे कागद व अन्य साहीत्या आढळुन आले. याप्रकरणात पोलिसांनी संतोष बेलदार यास देखिल ताब्यात घेण्यात आले आहे. तर बनावट नोटांच्या या काळाबाजारात विनोद उर्फ मनोज जाधव व मंगल पंजाब बेलदार या दोघांचा समावेश असल्याचे निदर्शनास आले. या चौघांच्या विरोधात शिरपुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईची माहीती देतांना पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत व अपर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव यांनी दिली .

बातम्या

Don`t copy text!