सिडको : नाशिक मिरर वृत्तसेवा
सिडकोतील कामटवाडे परिसरात करण उमेश चौरे (१७ संत कबीर नगर) या युवकाचा डोक्यात दगड घालून निर्गुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे.तर मागील वादाचे पडसाद उमटले असून यातूनच ही हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार उमेश चौरे याचा गंगापूर हद्दीतील एका खुणाच्या गुन्ह्यात समावेश असल्याचा संशय असल्याने त्यावर कायदेशीर कार्यवाही सुरु होती. तर वय कमी असल्याने त्याला बालसुधार गृहात होता. मात्र आठ दिवसांपूर्वी तो तेथून बाहेर आला होता. मात्र स्वतःच्या जीवाला धोका असल्याबाबत आई वडिलांना सूचित करून सिडकोतील कामाठवाडे येथे एका मित्राच्या घरी राहत होता.
दिनांक २८ सोमवार रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास करण हा कामाठवाडे येथील स्मशानभूमी रोड येथून जात असतांना पाच ते सहा संशईत हा त्याचा मागावर होते रस्त्यावर थांबवून करण ला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी दगड व फर्शी करणच्या डोक्यात टाकल्याने त्यास डोक्यास गंभीर ईजा झाल्याने व मोठ्या प्रमाणावर रक्तश्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
सदरची बातमी अंबड पोलिसांना समजल्यानंतर घटना स्थळ गाठत सदर घटनेची माहिती घेण्यास सुरुवात केली.यावेळी घटनास्थळी परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे घटनास्थळी पाहणी करण्यासाठी उपस्थित होते.तर संशईतांचा शोध घेण्यासाठी पोलीसांचे विविध पथक तयार करण्यात आले आहे. तर आकाश चौरे यांच्या फिर्यादीहून अंबड पोलिसात संशइतांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत करण चौरे हा वडिलांना प्लम्बिंग च्या कामात मदत करत असायचा. तर करणच्या पश्यात आई, वडील, भाऊ, वहिनी असा परिवार आहे.
खुनाचा घेतला बदला
पाच ते सहा हल्लेखोरांनी करण चौरे याच्यावर हल्ला करून तेथून जात असतांना बदला घेतला, बदला असे ओरडत ओरडत ठिकाणाहून दुचाकीवरून बसून पलायन केले.
एकाचा उपचारादरम्यान मृत्यू ;किरकोळ भांडणच्या कारणावरून दोन ते तीन जणांनी केली होती मारहाण
सिडको :किरकोळ भांडणच्या कारणावरून दोन ते तीन जणांनी मारहाण केल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत दीपक महादेव जोगदंड (वय 23 राहणार वृंदावन नगर अंबड नाशिक) यांना दि २४ वार गुरुवारी काहीतरी कारणाने त्यांचा मेहूना व इतर यांनी त्यांना मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या डोक्यास व बरगडीला मार लागला त्यांना उपचारासाठी त्यांची आई कल्पना जोंगदंड यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.मात्र उपचारासदरम्यान प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी मेडिकल कॉलेज येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा रविवारी मृत्यू झाला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.
