नाशिक मिरर वृत्तसेवा :
समाजासाठी झटणारे एक प्रखर व्यक्तिमत्त्व आणि समाजसेवेचे अविरत कार्य करणारे कै. श्री. श्रीराम विक्रम मंडळ (मंडलिक) वय ४६ यांचे दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी (गुरुवार, एकादशी) रात्री ९.३० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. गेल्या काही महिन्यापासून त्याच्यावर खाजगी उपचार सुरु होते.परंतु प्रकृती मध्ये सुधारणा होत नव्हती.
श्रीराम मंडळ हे संत सावता माळी मंडळ (श्रमिकनगर) चे अध्यक्ष, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद शहर उपाध्यक्ष, महारुद्र नागरी पतसंस्था संचालक आणि गुरु-शिष्य जयंती उत्सव समितीचे माजी अध्यक्ष होते. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. संत सावता माळी मंदिरात अखंड हरीनाम सप्ताह करणे.गुरु-शिष्य जयंती महोत्सव आयोजन, मंदिराचा जीर्ण उद्धार करणे या मध्ये त्याचे मोठे सहकार्य होते. समाजात समतेचा विचार रुजवण्यासाठी आणि मागासवर्गीय समाजाच्या न्यायहक्कांसाठी त्यांनी कायमच आवाज उठवला.त्यांचे कार्य क्षेत्र केवळ सातपूर पुरते समित नव्हते.मालेगाव व नाशिक जिल्ह्याच्या विविध भागांत त्यांनी सामाजिक जाणीव निर्माण केली. युवकांना सामाजिक कार्याकडे वळवण्यासाठी त्यांनी अनेक प्रेरणादायी उपक्रम राबवले.
त्यांच्या जाण्याने समाज एक सक्षम नेतृत्व, समतेचा प्रचारक आणि निष्ठावान कार्यकर्ता गमावला आहे. अनेक सामाजिक संघटनांनी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून, त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.मा. उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ कुटूंबाशी त्याची जवळचे संबंध होते.
त्यांचा अंत्यविधी दिनांक २५ एप्रिल २०२५ (शुक्रवार) रोजी सकाळी ११:०० वाजता त्यांच्या जन्मगावी – मु. पो. पाडळदे, ता. मालेगाव, जि. नाशिक – येथे होणार आहे.

