सातपूर परिसरात कुत्र्याने घेतला तीन जणांचा चावा

नाशिक मिरर :

सातपूर परिसरात नीलकंठेश्वर नगर येथे रस्त्याने जात असलेल्या बाईक स्वराच्या अंगावर झेप घेत चावा कुत्र्याने चावा घेतल्याचा प्रकार बुधवार (दि 16) रात्री घडला आहे. याच दरम्यान याच परिसरातील सावरकर नगर जात असताना शाम पांडे अशोक नगर दोन जणांनाही कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडली आहे. दोन दिवसात सातपूर परिसरात दहा जणांना कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडली आहे.सातपूर परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढलेला आहे. महापालिकेकडे वारंवार तक्रार करून प्रशासनाने डोळेझाक झाल्याने गंभीर प्रकार घडत आहे. रात्री नाईट ड्युटीला जाणाऱ्या तसेच सेकंड शिप वा पहाटे फर्स्ट शिफ्टला कामावर येणाऱ्या कामगारांच्या दुचाकी मागेही कुत्रे पळून हल्ला करण्याचा प्रकार होत आहे. मोकाट कुत्र्याने सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून महापालिका डॉग स्क्वाडव्याने कुत्रे पकडण्यात यावे अशी मागणी नागरिक करत आहे.

https://youtu.be/lWE5NDqIX6I?si=BueHoxoIVA98nvRc
गाडी चालवत असताना हल्ला

वळणावर गाडीचा स्पीड कमी केल्या असता मागून आलेला कुत्र्याने पायात चावा घेतला
-जितेन रजक

बातम्या

Don`t copy text!