नाशिक मिरर वृत्तसेवा :
इंदिरानगर|तुषार जगताप
नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक ३० येथील श्रद्धा विहार या भागात मा. सभागृह नेते व मा नगरसेवक श्री. सतीश बापू सोनवणे यांच्या निधीतून साकारलेल्या अद्यावत बॅडमिंटन हॉल चे आज उद्घाटन झाले.
यावेळी प्रभागतले सर्व नगरसेवक, श्रद्धा विहार या भागातील सर्व नागरिक उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी चे शहर उपाध्यक्ष, मा नगरसेवक सतीश बापू सोनवणे हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे त्यांनी यावेळेस सांगितले. प्रभागातील सर्व खेळाडूंना प्रशिक्षण घेण्याकरिता कॉलेज रोड येथे जावे लागायचे. हाच विचार करून या भागात बॅडमिंटन हॉल बांधायचे विचार सभागृह नेते असताना केला व आज तो पूर्ण झाला याचा आनंद आहे. असे देखील त्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित सर्व नागरिकांनी बापूंचा व सर्व नगरसेवकांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले.
