नाशिक मिरर वृत्तसेवा :
इंदिरानगर|तुषार जगताप
भारताच्या ७६ व्या गणतंत्र दिवसाच्या निमित्ताने द्वारकामाई चौक, राजीव नगर येथे ‘भारतमाता पूजन’ आणि ‘संविधान उद्देशिकेच्या’ सामुहिक वाचनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
राष्ट्र सेविका समितीच्या कार्यवाहिका सुहासिनी रत्नपारखी, सोनीला राव यांच्या हस्ते भारतमाता आणि संविधान उद्देशिका यांच्या प्रतिमेचे पूजन संपन्न झाले.
या कार्यक्रमाविषयी मार्गदर्शन करताना, या उपक्रमामागील उद्दिष्ट राष्ट्रप्रेम जागृत करणे. संविधानाबद्दल आदर व्यक्त करणे आणि लोकशाही मूल्यांचा प्रचार व प्रसार करणे हे असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गुरु गोविंदसिंग नगर कार्यवाह रोहीत गायधनी यांनी व्यक्त केले. तर
अतुल देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन संपन्न झाले.
वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताने या कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर प्रसाद म्हणून लाडूंचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला हिंदू जनसंपर्क कार्यालयाचे सागर देशमुख, आशिष पवार, लखन दोंदे, आप्पासाहेब शेजवळ, निलेश सानप, विश्वनाथ मानमोठे, विठ्ठल जाधव, पुष्कर देशपांडे, राहुल राजपूत, पप्पू वाडीले, नाना दंडगव्हाळ, धनंजय पाठक, केदार जोशी, दिगंबर नळे, रूपेश सावंत, जयवंत पवार, प्रमोद लासूरे, विशाल सांगळे, सुरेंद्र कुलकर्णी, विश्वजीत सावंत, प्रतिक फड, स्वप्निल वाघ, गजानन लिपणे आदी़ंसह परिसरातील देशभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


