नाशिक मिरर वृत्तसेवा :
इंदिरानगर |तुषार जगताप
नाशिक मनपा प्रभाग ३१ मधील भाजपाचे संजय गायकवाड यांचा दरवर्षी एक झेंडावंदनासाठी लागणारा स्तंभ उभारण्याचा प्रण करण्यात आला आहे.
प्रभाग ३१ मधील भाजपाचे संजय गायकवाड यांनी रामेश्वर मंदिराजवळील गार्डन साठी असलेल्या ओपन स्पेस मध्ये झेंडावंदनासाठी वस्तीतील नागरिकांच्या मागणीवरून स्तंभाची बांधणी करून दिली.आजूबाजूच्या सात ते आठ बिल्डींग मधील रहिवाशांनी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी झेंडावंदनाचा मोठा कार्यक्रम आयोजित केला होता .भाजपाचे संजय गायकवाड यांना प्रमुख अतिथी म्हणून बोलविण्यात आले होते.यावेळी सर्व नागरिकांनी त्यांचे आभार मानले व त्यांचा सत्कार देखील करण्यात आला.
यावेळी बोलताना संजय गायकवाड यांनी सांगितले की प्रभाग क्रमांक ३१ मध्ये दरवर्षी झेंडावंदनासाठी एक नवीन जागेत स्तंभ उभारण्यात येईल.सर्व जाती धर्मातील नागरिकांना या झेंडावंदनासाठी एक एकत्रित यावे हाच या पाठीमागचा उद्देश.कार्यक्रमात झेंडावंदनाचा बरोबर भारतीय संविधान उद्देशिकेचे देखील वाचन करण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन प्रथमेश बिल्डिंग, चैतन्य बिल्डिंग, दुर्वांकुर बिल्डिंग, साईराज बिल्डिंग, रत्नदीप बिल्डिंग, श्रीजी प्लाझा बिल्डिंग आणि गार्डनच्या आजूबाजूला राहणाऱ्या सर्व रहिवाशांनी केले.
कार्यक्रमास परिसरातील सर्व नागरिक व बाळ गोपाळ उपस्थित होते.तसेच भाजपाचे महाराष्ट्राचे सोशल मीडिया प्रमुख प्रशांत बडगुजर आणि भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस महेश कुलकर्णी देखील हजर होते.महेश कुलकर्णी यांनी संविधान उद्देशिकाचे वाचन केले.आणि प्रशांत बडगुजर यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व आणि संविधानाबद्दल महत्त्वाची माहिती नागरिकांना सांगितली.

