प्रयागराज महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी; अमृत स्नान रद्द
https://youtube.com/@nashikmirrornews?si=BylWF7OuXUXR2sX
संगमनगरी प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये कोट्यवधी साधूसंत आणि सामान्य नागरिकांनी हजेरी लावली आहे. मात्र आता या दरम्यान एक दुःखद घटना घडली आहे.
महाकुंभातील दुसऱ्या अमृत स्नान महोत्सवानिमित्त मौनी अमावस्येपूर्वी संगमावर चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत.
दि. २९ जानेवारी आज पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास अमृत स्नानासाठी गंगेच्या विविध घाटांवर जमण्यास सुरुवात केली आणि बॅरिकेट उघडताच इथं जमाव नियंत्रणाबाहेर गेला आणि भयंकर स्वरुपात चेंगराचेंगरी झाली आहे. त्यानंतर अमृत स्नान रद्द करण्यात आले आहे.
महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुद्धा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत घटनास्थळाचा आढावा घेतला आहे.
WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा*_ 👉 https://www.nashikmirror.com
