नाशिक मिरर वृत्तसेवा : सातपूरमधील अशोकनगर परिसरात एका १६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत युवकाची ओळख कु. यशराज तुकाराम गांगुर्डे (वय १६, रा. पवार संकुल, अशोकनगर) अशी आहे. यशराज मॉर्डन माध्यमिक विद्यालयात इयत्ता १०वी मध्ये शिक्षण घेत होता.
मयत यशराज तुकाराम गांगुर्डे(फोटो)
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, यशराज हा शनिवार दि. २ऑगस्ट रोजी सायंकाळी आपल्या मित्रासोबत अशोकनगर येथील राज्य कर्मचारी वसाहतीजवळ गार्डन जवळ असलेल्या खासगी शिकवणी वर्गाकडे जात असताना अचानक चक्कर येऊन खाली कोसळला. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तातडीने त्याला नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
घटनेनंतर परिसरात अनेक तर्कवितर्क सुरू झाले असून काही नागरिकांनी सांगितले की, यशराज आणि त्याच्या मित्रामध्ये बेंच वर बसण्याच्या जागेवरून किरकोळ वादातून हाणामारी झाली असून, व त्यातच त्याच्या डोक्याला जबर इजा झाली. व गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.मात्र, ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, त्यावरून घटनेचा नेमका प्रकार समजण्यास मदत होणार आहे.
या घटनेने यशराजच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून त्याच्या पश्चात आई व मोठा भाऊ असा परिवार आहे.यशराज वडील यांनी देखील कोरोनो काळात कर्जबाजरी झाल्याने काही वर्षा पूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मोठा भाऊ शाळेत स्कुलवाहन चालक असून विद्यार्थी पोहचवण्या काम करतो.
या प्रकरणाचा अधिक तपास सातपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी करत असून, घटनेमागील नेमकं कारण स्पष्ट होण्याची प्रतिक्षा सर्वत्र आहे.
*बातमी मधील फोटो AI जनरेट काल्पनिक आहे.
………..