नाशिक मिरर वृत्तसेवा : कळवण
शासनाने वारंवार परिपत्रके काढून कठोर सूचना दिल्यानंतरही काही सरकारी कार्यालयांमध्ये वैयक्तिक कार्यक्रम साजरे केल्याचे समोर आले आहे. कलवण तालुक्यातील पोस्ट ऑफिसमध्ये (दि.१४ सप्टेंबर, शनिवारी) एका अधिकाऱ्याचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. या प्रकारामुळे “महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तनूक नियम १९७९)” चा भंग झाल्याची गंभीर बाब पुढे आली असून, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शासकीय कार्यालयात वाढदिवस, स्वागत समारंभ किंवा इतर खासगी कार्यक्रम घेणे नियमबाह्य असून, अशा कृतीमुळे कामकाजात अडथळे निर्माण होतात. तरीसुद्धा कलवण पोस्ट विभागातील अधिकाऱ्यांनी नियम धाब्यावर बसवून वाढदिवसाचा केक कापत आनंद साजरा केला. या घटनेनंतर परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
प्रियेसीने दुसऱ्या सोबत लग्न केल्याने बॉयफ्रेंडने प्रियेसीच्या नवऱ्याचे अपहरण करुन हत्याचा कट👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
नागरिकांच्या कामकाजाला विलंब
कलवणासह ग्रामीण भागातील शेतकरी व नागरिक शासकीय कामकाजासाठी पोस्ट ऑफिससह विविध कार्यालयात येतात. त्याच वेळी वाढदिवसाच्या कार्यक्रमामुळे कामकाज ठप्प झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. यामुळे कामकाजाला अनावश्यक विलंब झाला. प्रशासन जनतेच्या नाराजीला सामोरे जात असताना, अशा घटना घडल्याने संताप आणखी वाढला आहे.
शासनाच्या आदेशानुसार कोणत्याही शासकीय कार्यालयात अशा प्रकारचे खासगी कार्यक्रम घेणे सक्त मनाई आहे. मात्र, आदेश धाब्यावर बसवून असे प्रकार सुरू राहिल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.