नाशिक मिरर वृत्तसेवा : अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शतक महोत्सवानिमित्त आयोजित रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महात्मा नगर येथील कार्यालयात लाईफलाईन ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबीराचे आयोजित करण्यात आले होते.
दीपप्रज्वलन व सरस्वतीपूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कोर्स समन्वयक अक्षदा आहेर यांनी प्रास्ताविक केले.विभागीय संचालक श्री जीवन सोनवणे यांनी संस्थेच्या शतक महोत्सवा निमित्त घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली.तसेच संस्थेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
लाईफलाईन ब्लड बँकेच्या लीना निकम व तंत्रज्ञ मयूर माळी यांनी रक्तदानाचे महत्व सांगून थैलेसेमिया या आजाराला रक्त किती आवश्यक आहे याची माहिती दिली.ब्लड बँक दर 21 दिवसांनी 180 थैलेसेमिया रुग्णांना रक्त पुरवठा करत असल्याची माहिती त्यांनी दिली.डॉ.वर्षा जाधव यांनी रक्तदानाचे फायदे सांगितले.स्वच्छता निरीक्षक कोर्सच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले.विशेष म्हणजे विद्यार्थिनींसुद्धा रक्तदान केले.या मानवतावादी उपक्रमाबद्दल संस्थेला स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
प्रियेसीने दुसऱ्या सोबत लग्न केल्याने बॉयफ्रेंडने प्रियेसीच्या नवऱ्याचे अपहरण करुन हत्याचा कट👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
सूत्रसंचालन अक्षदा आहेर यांनी केले.रुपाली व्यवहारे यांनी आभार मानले.शिबिरात 30 रक्तदात्यांनी रक्तदान करुन आपले कर्तव्य बजावले.रक्तदात्यांना संस्थेचे संचालक जीवन सोनवणे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
