नाशिक मिरर वृत्तसेवा :

सातपूर-त्र्यंबक रोडवरील पपया नर्सरीजवळ गुरुवारी (दि. १८ सप्टेंबर) दुपारी झालेल्या भीषण अपघातात कोरडे नगर, गंगापूर येथील रहिवासी दशरथ मनोहर राजवत (वय ६५) यांचा जागीच मृत्यू झाला.

 

मिळालेल्या माहितीनुसार, राजवत हे अंबड येथे कामानिमित्त गेले होते. काम आटोपून ते आपल्या जुपिटर दुचाकी (क्रमांक MH 15 GU 5463) ने घरी परतत होते. दुपारी सुमारास पपया नर्सरीजवळ पोहोचताच, मागून येणाऱ्या अवजड चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात राजवत गंभीर जखमी झाले आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.

अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर वाहनचालक पसार झाला असल्याची माहिती असून, याबाबत सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास सातपूर पोलिस करत आहेत.

 

Don`t copy text!