गुन्हे शोध पथकाची यशस्वी कारवाई

 गावठी कट्ट्यासह ३७ वर्षीय इसम अटक

गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून कारवाई

 ८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

नाशिक मिरर वृत्तसेवा : सातपूर  अंबड लिंक रोड परिसरात बुधवारी पहाटे गावठी कट्टा विकण्यासाठी येणार असल्याच्या गुप्त बातमीद्वारे सातपूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करत एका ३७ वर्षीय इसमाला रंगेहात पकडत बेड्या ठोकल्या आहे.

 

       शिवाजी पवार (वय २७, रा.दत्त नगर, चुंचाळे शिवार, अंबड, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशिताचे नाव आहे. पोअं. सागर गुंजाळ यांनी ही यशस्वी कामगिरी केली आहे.

 

          नाशिक शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत सातपूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने बुधवारी पहाटे ही कारवाई केली आहे. 

 

पोलीस उपायुक्त किशोर काळे व सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली. गुन्हे शोध पथकातील पोहवा. दीपक खरपडे, पोअं. तुषार देसले, पोअं. सागर गुंजाळ, पोअं. मुषण शेजवळ व पोअं. योगेश्वर गायकवाड हे बुधवारी पहाटे ५ वाजता बजरंग नगर परिसरात पेट्रोलिंग करत असताना पोअं. सागर गुंजाळ यांना गुप्त बातमीदारामार्फत एक इसम गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली.

 

दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या सूचनेनुसार आणि पोउनि. बटुळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी बजरंगनगर ते सातपूर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर शिव हाईट्स इमारतीजवळ सापळा रचला. गुप्त माहितीतील वर्णनाशी मिळता जुळता इसम त्या ठिकाणी दिसल्यावर पोलिसांनी त्याला शिताफीने अटक केली.

अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव शिवाजी पवार (वय २७, रा.दत्त नगर, चुंचाळे शिवार, अंबड) असे असून त्याची अंगझडती घेतली असता १५,००० रुपये किमतीचा देशी बनावटीचा गावठी कट्टा पोलिसांनी जप्त केला.

 

शिवाजी पवार याच्यावर शस्त्र अधिनियम १९५९ अंतर्गत कलम ३/२५ आणि महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १३५ अन्वये सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. २३५/२०२५ नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि. मनोज वाघमारे करत आहेत. संशयित आरोपी पवार याला न्यायालयात हजर केले असता ८ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत परवानगी करण्यात आली आहे.

……

Don`t copy text!