नाशिक मिरर वृत्तसेवा : विशेष प्रतिनिधी मंगेश एरंडे
मॉडर्न शाळेतील प्राथमिक विभागाचे रंजय महाले यांची कायमस्वरूपी मुख्याध्यापक पदावर निवड करण्यात आली.त्यांच्या या निवडीबद्दल शाळेतील स्कूल व्हॅन चालक-मालक संघटना तसेच शिक्षक वृंद यांच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात शाळेतील शिक्षक, कर्मचारी आणि व्हॅन चालक-मालक यांच्यावतीने रंजय महाले सर यांना पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला .
यावेळी कांतीलाल महाले,बाळकृष्ण पाटील,रतन एरंडे,जिजाबराव पवार, मंगेश एरंडे, नाना देवढे, निंबा पाटील, भाऊसाहेब भागवत, रावसाहेब पाटील, सोमनाथ माळी, कैलास देवरे, नंदू पवार,विष्णु एरंडे व राहुल पवार आदी उपस्थित होते.