नाशिक मिरर वृत्तसेवा :
शिवसेना उपमहानगरप्रमुख कल्पेश कांडेकर यांच्या कार्यालयात शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त नायब सुभेदार ज्ञानेश्वर निवृत्ती बोरसे होते. त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला.तसेच उपस्थित सर्व जेष्ठ नागरिकांना छत्री वाटप करण्यात आल्या.
यावेळी कल्पेश कांडेकर यांनी वाचन संस्कृतीचे महत्त्व विशद करत अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामुळे तरुणांना प्रेरणा मिळते असे सांगितले. समाजातील सर्व जातीधर्मीयांनी एकत्र येऊन त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज पाटील यांनी केले. तर नितीन मनगटे यांनी आभार मानले. यावेळी विकी कांबळे, कावेरी कांडेकर प्रतिभा फुसे, शिला कोळी, दीपाश्री देवरे आदीसह भरतराज देशमुख, शिवाजी निमसे, गोकुळ कटारे, पढरीनाथ बेडकर, विजय बोरसे, शंकर खकाळे, रामनाथ गांगुर्डे, दत्तात्रय पेहेरे, रतन वाघचौरे व मोठ्या संख्येने इतर जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
……..

