नाशिक मिरर :राजू अनमोला सातपूर प्रतिनिधी
श्री गणराया पाठोपाठ सातपूर परिसरात घराघरात गौरींच आगमन झाल्याने सर्वत्र आनंदाच वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले.सातपूर मधील श्रमिकनगर,माळी कॉलनी, सातपूर कॉलनी ,सावरकर नगर, राधाकृष्णनगर, विश्वासनगर, कामगारनगर,महात्मा नगर आदींसह इतर भागात सोनपावलांनी आलेल्या गौरींच्या स्वागतासाठी घरोघर लगबग सुरू होती. प्रत्येक ठिकाणी गौरींसाठी उत्तम सजावट करण्यात आलेली होती. विविध रंगाचे हारफुलानी गौरी ला सजवण्यात आले होते.विविध प्रकारचे फळे, स्विट्स पदार्थ, नैवद्य देण्यात आला होतो.माहेरी आलेल्या गौरींच्या नैवेद्यासाठी विविध पदार्थ तयार करण्यासाठी महिलावर्गाची धावपळ सुरू होती. घरांसमोर विविधरंगी रांगोळ्या व गौरींचे सोनपावलं लक्ष वेधून घेत आहेत. गौरी गणपतीच्या आगमनामुळे घरातील लहान मुलांमध्ये उत्साह दिसून येत होता.

