नाशिक मिरर :

नाशिक महापालिकेच्या प्रभाग सभापती पदाच्या निवडणुका होऊन दीड महिना उलटला असताना या कालावधीत सातपूर प्रभाग सभापती यांनी सर्व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक ८ ,९ ,१०, ११ व प्रभाग क्रमांक २६ या पाचही प्रभागात नागरिकांच्या समस्या जाणून घेत प्रभागातील स्थानिक नगरसेवक व नागरिक यांच्या सह प्रभाग दौरे करण्यात येत आहेत.

यामध्ये नागरिकांच्या अशा काही समस्या समोर आल्या की, त्या तात्काळ सोडवल्या जाणे शक्य होते,परंतु अधिकारी यांच्या हलगर्जीपणा मुळे सदर समस्या महिनोन्महिने सुटत नव्हत्या.परंतु सभापती शेवरे यांनी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन सदर समस्या तत्काळ सोडवण्याचे आदेश दिले.या दरम्यानविभागीय कार्यालयातील पाणीपुरवठा, आरोग्य विभाग,ड्रेनेज विभाग, विद्युत विभाग, तसेच घरपट्टी व विविध कर अशा अनेक विभागांना भेटी देण्यात आले.

यावेळी अधिकाऱ्यांच्या ही समस्या प्रभाग सभापती योगेश शेवरे यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे जन्म-मृत्यू विभागाचे कनिष्ठ लिपिक हे मात्र ड्युटीवर फक्त हजेरी लावतात.आणि काम न करता संध्याकाळी सुट्टी करून घरी निघून जातात ही बाब सभापती योगेश शेवरे यांच्या लक्षात आल्यानंतर सभापतींनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले. त्याचप्रमाणे गेल्या कित्येक वर्षापासून बंद पडलेला सातपूर टाऊन हॉलच देखील या वेळी पाहणी करण्यात आली. टाऊन हॉल ची अवस्था अतिशय दैनीय अशी झालेली असताना टाऊन हॉल या विषयावर मनपा आयुक्तांना सभापती योगेश शेवरे यांनी निवेदन देखील सादर केलेलं होते. यावर कुठलीही शाश्वत कार्यवाही मनपा प्रशासनाकडून आत्तापर्यंत करण्यात आलेली नाही.

यावर सभापतींनी लक्ष देण्याची गरज असल्याचं नागरिकांकडून यावेळी सांगण्यात आले. या सर्वच विषयांवर प्रभाग सभापती योगेश शेवरे यांनी माहिती दिली. यावेळी सर्व अधिकारी उपस्थित होते.तसेच जितेंद्र कुलथे, विनोद यादव, विजय गवारे, राहुल सहाणे, अविनाश पाटील, हे देखील या पाहणी दौऱ्यात सहभागी झाले होते.

 

बातम्या

Don`t copy text!