नाशिक मिरर : म्हसरूळ प्रतिनिधी

नावातच चहा…एकदा घेऊन तर पहा…असा आग्रहच युवा असलेले तुषार भोसले यांनी समस्त नाशिककर चहाप्रेमींना केला आहे. चहाला वेळ नसते…पण, वेळेला चहा हवाच…! हे तर खरे आहे.

चहाच्या आधी वडापाव खायचा आहे, हेही ते आठवणीने सांगतात. म्हणजे असे की, स्वादिष्ट गरमागरम वडापाव खायचा व त्यावर वाफाळता चहा प्यायचा आहे.

      या आमंत्रणाचे कारणच तसे आहे.

          ते नव्या व्यवसायात उतरले आहेत. म्हसरूळमधील अनेक युवा-तरूण व्यवसायात वेगवेगळे प्रयोग करत आहेत. यात आणखी एक नाव जोडले जात आहे. ते म्हणजे म्हसरूळचे तुषार रमेश भोसले यांचे. त्यांच्या `पंचवटी अमृततुल्य व पंचवटी वडापाव शाखे’चे उद्घाटन मंगळवारी (ता.14) सायंकाळी होत आहे. विशेष म्हणजे वडापावची पंढरी मानल्या जाणाऱ्या नाशिक शहरातील अशोक स्तंभ परिसरात.

   हा उद्घाटन कार्यक्रम मंगळवारी (दि.14) सायंकाळी 7 वाजता होणार आहे. उद्घाटक म्हणून आमदार देवयानी फरांदे, नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती गणेश गिते, माजी आमदार नितीन भोसले, माजी महापौर रंजनाताई भानसी, गटनेते व नगरसेवक अरूण पवार हे असतील.

           विशेष उपस्थिती छत्रपती युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश कदम यांची असणार आहे.


           प्रमुख पाहुणे म्हणून राज्य समन्वयक पुष्पाताई जगताप, प्रदेश सरचिटणीस ज्ञानेश्वर भोसले, प्रदेश अध्यक्ष अरुण पाटील, शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आण्णासाहेब खाडे, चित्रपट आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आनंद बच्छाव, महिला चित्रपट आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा स्मिता प्रभू, वि. आघाडीचे प्रदेशाध्यक्ष यश बच्छाव, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भिकन राजपूत, मराठवाडा अध्यक्ष कृष्णा पराड, जिल्हाप्रमुख तुषार भोसले, जिल्हाप्रमुख समाधान वाकचौरे, जिल्हाप्रमुख टिनु पगार, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मंगलाताई शिंदे, उपजिल्हाप्रमुख बंटी बनकर, जिल्हा संघटक शाम राऊत, महानगरप्रमुख गणेश जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष मयुर दाते, महिला आघाडीच्या महानगरप्रमुख रोहिणी दळवी, वाहतूक सेनेचे संजय बर्वे, तालुका संपर्कप्रमुख गणेश जाधव, तालुका प्रमुख सचिन देशमुख उपस्थित राहणार आहेत.

बातम्या

Don`t copy text!