नाशिक मिरर :  येथील परिसरातील नंदिनी ( नासर्डी)नदी प्रदुषण मुक्त होवुन अस्वच्छतेच्या विळख्यातून बाहेर काढून नदीने मोकळा श्वास घ्यावा.व  गतवैभव प्राप्त करून नाशिककरांसाठी आकर्षण केंद्र व्हावे यासाठी भाजपच्या पर्यावरण मंचाने स्वच्छता व सुशोभिकरणासाठी मोहीम हाती घेतली आहे.

 

सातपुर मंडलातील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व पर्यावरणप्रेमींनी काल जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सातपुर आयटीआय पुलापासून अंबड लिंकरोडकडे जाणारा मधला रोड, सातपुर भाजी मार्केट पुल ते अंबडलिंकरोड च्या पुलापर्यंत तसेच पुढे सातपूर हद्दीतील नंदिनी नदीच्या काठाने सलग १० -१० फुटांच्या अंतरावर भाजपाचे कार्यकर्त्यांनी साखळीने उभे राहुन आरोग्य मानवी साखळी व स्वच्छता मोहीम कोरोनाच्या नियमांचे पालन करून राबविण्यात आली.

याबाबत शहर कार्यकारिणीचे महेंद्र शिंदे, सातपुर शहरातील निलेश भंदुरे, ज्येष्ठ नेते किसनराव विधाते, पर्यावरण प्रेमी सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ, सातपुर चे ग्रामस्त सातपुर प्रभाग समिती स्विकृत सदस्य विजय भंदुरे, तसेच महिला आघाडीच्या हर्षा फिरोदिया आदिनी यावेळी पर्यावरणाचा नित्य होणारा र्हास कशा प्रकारे रोखु शकतो या सखोल माहिती दिली.

यावेळी नगरसेवक दिनकर पाटील, शशी जाधव,अमोल ईघे,भगवान काकड, चारुदत्त आहेर,विक्रम नागरे, रामहरी संभेराव,रविंद्र धिवरे, नगरसेविका वर्षा भालेराव, माधुरी बोलकर,हेमलता कांडेकर,इंदुबाई नागरे,गौरव बोडके,गौरव घोलप, संंगिता शेळके,योगेश मालुंजकर, पांडुरंग खोटरे,अमोल पाटील,नितिन शेवरे,संदिप काळे,निलेश सोनार,रविंद्र उगले आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थितीत होते.

Don`t copy text!