श्रमिकनगर मधील क्रांती मित्र मंडळाच्या विलोभनीय दुर्गा मातेच्या मूर्ती ने वेधले सातपूरकराचे लक्ष

नाशिक मिरर वृत्तसेवा :

सातपूर मधील श्रमिकनगर मध्ये नवरात्रोत्सव निमित्ताने युवा क्रांती मित्र मंडळाच्या वतीने दुर्गा मातेच्या विलोभनीय आकर्षक देवी मूर्ती स्थापना केली असून, मूर्ती सातपूर कराचे लक्ष वेधून घेत आहे. सातपूर मधील देवी भक्ताची दर्शनासाठी गर्दी झाल्याचे दिसून येत आहे.
विठ्ठल रुक्मिणी व श्री संत सावता माळी मंदिर येथे सदर सभामंडप उभारण्यात आलेला आहे. मंडळाचे अध्यक्ष विकास महाजन, उपाध्यक्ष अतुल काळे यांनी विशेष सेवा घेतली आहे.यासाठी मोलाचे सहकार्य छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर ,मा. नगरसेवक सदाशिव माळी, दिनकर कांडेकर, पोपटराव जेजुरकर केले आहे.

 

बातम्या

Don`t copy text!