रितेश जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त सन्मान सोहळा

कंत्राटदार, सप्लायर्सना प्रशस्तीपत्रक तर कामगारांना सुरक्षा किट

नाशिक मिरर वृत्तसेवा :

बांधकाम क्षेत्राच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणाऱ्या कामगार, कंत्राटदार आणि मटेरियल सप्लायर्स यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने रोशन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स व श्री गणेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या वतीने विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

इंजि. रितेश संतोष जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त इंजि. रितेश जगताप व इंजि. रोशन साहेबराव कापडणीस यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. इंजि. ऋषिकेश पाटील व गणेश भाऊ मौले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या सोहळ्यात विविध कंत्राटदार व मटेरियल सप्लायर्स यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. 

बांधकामाच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत यावेळी सर्व कामगारांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले. वाढदिवसाचा आनंद केवळ सत्कारापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी संतोष दादा जगताप, संपत चुंभळे सर, प्रताप पाटील, अविनाश पाटील, संदिप भाकरे, राजाराम भोर यांच्यासह बांधकाम क्षेत्रातील अनेक मान्यवर, कंत्राटदार, मटेरियल सप्लायर्स आणि मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.

 

यावेळी मार्गदर्शन करताना संपत चुंभळे सर म्हणाले, बांधकाम क्षेत्राच्या जडणघडणीत कामगारांपासून ते कंत्राटदार आणि साहित्य पुरवठादारांपर्यंत प्रत्येक घटकाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांचा सन्मान करणे ही खऱ्या अर्थाने सकारात्मक बाब आहे.

कार्यक्रमाचा समारोप स्नेहभोजनाने करण्यात आला. सन्मान, सुरक्षा आणि आपुलकी या त्रिसूत्रीच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्रातील सहकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सोहळा ठरला.

Don`t copy text!