श्रमिकनगर मध्ये संत सावता महाराज पुण्यतिथी सोहळ्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

नाशिक मिरर : वृत्तसेवा
श्रमिकनगर येथील श्री विठ्ठल रुख्मिणी व संत सावता महाराज मंदिराचा वर्धापन दिन व श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त मंदिराच्या प्रांगणात. बुधवार दि. ३१ जुलै ते ७ ऑगस्ट २०२४ दरम्यान संगीतमय भागवत कथा व अखंड हरिनाम कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

         कार्यक्रमचे ३५ वे वर्ष असून दि ३१ जुलै रोजी सकाळी ८वा कलश पूजन,विनापूजन, धर्ममंडम, साहित्य,ग्रंथ पूजन करून सप्ताह सर्वात करण्यात येणार आहे.या दरम्यान रोज सकाळी ५ ते ६ काकडा आरती, भजन,दु. २ ते ५ भागवत कथा, सायं ५ते ६ हरिपाठ व रात्री ८ ते १० श्री हरि कीर्तन होणार आहे. दि ३१ जुलै रोजी ह. भ.प एकनाथ महाराज धुळेकर, दि १ ऑगस्ट रोजी संदीप महाराज खकाळे त्र्यंबकेश्वर, दि.२ रोजी वासुदेव म. सोनवणे रावळगावकर, दि. ३ रोजी विश्वनाथ म. सोनार वाडेकर, दि ४ रोजी रामचंद्र महाराज ताहाराबादकर दि.५ रोजी रामेश्वर महाराज महाजन पाळधीकर, दि ६ रोजी सूर्यभान महाराज शेळगावकर जळगाव, याचे कीर्तन तसेच या दिवशी दु. २ ते ५ या वेळेत परिसरातून सावता महाराज यांची भव्य पालखी मिरवणूक निघणार आहे. बुधवार दि. ७ रोजी स. ९ ते ११ सोपान महाराज सोनवणे रावळगावंकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताह सांगता होणार आहे.दि ७रोजी कीर्तनानंतर महाप्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे.

        कार्यक्रमाचे आयोजन श्री संत सावता माळी मंडळ व मंदिर समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य, वर्गणीदार यांनी सर्वानी मिळून केले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष श्रीराम मंडळ यांनी दिली.

बातम्या

Don`t copy text!