नाशिक मिरर वृत्तसेवा :सागर आनप
श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी व श्री संत सावता महाराज मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त सातपूर येथील माळी कॉलनी, श्रमिकनगर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी व श्री संत सावता महाराज मंदिर, श्री संत सावता महाराज पुण्यतिथी उत्सव समिती आणि सभा मंडप बांधकाम समितीच्या वतीने हा धार्मिक उत्सव आयोजित करण्यात आला आहे.
५ ते १२ ऑगस्टदरम्यान कीर्तन महोत्सव आयोजन करण्यात आले आहे. सकाळी साडेआठ ते साडेबारा वाजेदरम्यान ज्ञानेश्वरी पारायण, सायं. ५ते८ हरिपाठ,
बुधवार (दि. ५) ते मंगळवार (दि. ११ ऑगस्ट) या कालावधीत दररोज सायंकाळी साडेआठ वाजता महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांच्या उपस्थितीत अखंड हरिनाम कीर्तन महोत्सव होणार आहे. या माध्यमातून संत सावता महाराजांच्या विचारांचा आणि भक्तीपरंपरेचा जागर करण्यात येणार आहे.
मंगळवार (दि. ११) रोजी संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत भव्य दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सायंकाळी ह.भ.प. ऋषिकेश महाराज चव्हाण यांचे जाहीर कीर्तन होणार आहे.
बुधवार (दि. १२ ऑगस्ट) रोजी सकाळी १० वा ह.भ.प. विवेक महाराज केदार यांच्या काल्याच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमाने धार्मिक उत्सवाची सांगता होणार आहे.
या सर्व धार्मिक कार्यक्रमांना सातपूर परिसरातील नागरिक, भाविक व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. मंडळाचे अध्यक्ष गोविंद माळी, गुलाब माळी, उपाध्यक्ष एकनाथ माळी, ज्ञानेश्वर थोरात, राजेश महाजन, रवींद्र महाजन, दिलीप महाले, ज्ञानेश्वर महाजन आणि महेश माळी यांनी भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. वाळू थोरात,प्रकाश महाजन ज्ञानेश्वर पेहेरे,हनुमान सोनवणे,पोपटराव जेजुरकर,शिवाजी माळी, एडवोकेट.देवमन शिंदे,संजय महाजन,राजाराम महाजन, ज्ञानेश्वर बोरसे,अशोक महाले, विश्वनाथ महाजन, रघुनाथ मौले,बाळू अहिरे, मोलाचे सहकार्य लाभले आहे.कार्यक्रमाचे आयोजन सर्व पदाधिकारी, सदस्य व देणगीदार यांनी केले आहे.
