सातपुर मधील माजी नगरसेविका यांच्या पतीवर भावाची फसवणुक केल्याबद्दल गुन्हा दाखल 

भागीदारीत भावानेच केली भावाची ७० लाखांची फसवणूक
नाशिक मिरर वृत्तसेवा :
       सातपुर  वाईन शॉपच्या व्यवसायात ५० टक्के भागीदारीचे आमिष दाखवून भावानेच भावाची सुमारे ७० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
         याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी जगन्नाथ नामदेव निगळ (वय ६९) व माजी नगरसेविका सीमा निगळ यांचे पती संशयित आरोपी गोकुळ नामदेव निगळ (वय ५५, दोघेही रा. निगळ गल्ली, सातपूर गाव हे दोघे सख्येभाऊ आहेत.
         यातील संशयित आरोपी गोकुळ निगळ याने फिर्यादी जगन्नाथ निगळ यांना सातपूर त्रंबक रोड राजवाड्यात हेवर्ड्स ५००० या वाईन शॉपचे लायसन्स पार्टनरशिपमध्ये घेऊन दोघेही प्रत्येकी ५० टक्के भागीदारीचे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन करून ६८ लाख ७३ हजार २० रुपये व इतर खर्च निगळ कृषी सेवा केंद्र या संस्थेच्या नावावर कर्ज काढून खर्च करावयास लावले. सातपूर गावातील
त्र्यंबक रोड येथे प्रत्यक्ष वाईन शॉप सुरू झाल्यानंतर आजपर्यंत आरोपी गोकुळ निगळ दुकानाच्या व्यवसायातून येणारे पेमेंट स्वतःचा फायदा व्हावा, या उद्देशाने भागीदारी संस्थेच्या बँक खात्यावर न घेता परस्पर स्वतःच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा होण्यासाठी स्वतःच्या बँक खात्याचे क्यूआर कोड दुकानामध्ये ठेवले आहे. व त्यातील मिळणारी रक्कम फिर्यादी जगन्नाथ निगळ यांच्या संमतीशिवाय स्वतःच्या फायद्यासाठी वापरून भावाचीच फसवणूक केली. हा प्रकार सन २०१४ पासून ते २४ जुलै २०२४ या कालावधीत निगळ कृषी सेवा केंद्र, सातपूर गाव येथे घडला.या फसवणुकी प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गोकुळ निगळ यांच्याविरुद्ध कलम ३१८ ( ४ ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

बातम्या

Don`t copy text!