नाशिक मिरर : वृत्तसेवा
सातपुर येथील शिवाजीनगर मधील बांधकाम साईट च्या खड्ड्यामध्ये साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेले दोन मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिवाजी नगर कार्बन नाका जवळील छत्रपती शिवाजी महाराज मनपा विद्यालय रस्तावर गुरुद्वारा जवळ खाजगी बांधकाम साईट वर बांधकाम करण्यासाठी मोठा खड्डा खोदण्यात आला होता. या खड्यात मुसळधार पाऊसाने मोठ्या स्वरूपात पाणी साचले होते. यामध्ये दि. ५ ऑगस्ट रोजी दु.५ वाजेच्या सुमारास १२ ते १५ वर्ष वयाचे ४ ते ५ मुले खड्यात पोहण्यासाठी गेले होते. अंकुश किरण गाडे वय १५ रा शिवाजीनगर जलकूभं, व प्रणव विनोद सोनटके वय १५ रा अथर्व सुमर मार्केट कडे पठार चौक दोघेही बालशिक्षण मंदिर जनता विदयालय इ ९ वी मध्ये एकाच वर्गात शिकत होते. या दोन मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.साडेपाच वाजेला शाळेतून आल्यानंतर मित्रा सोबत पोहायला गेले होते.चार ते पाच जन पोहत होते. त्यातील मयत दोघांचे पाय चिखलात अडकल्याने ते बुडाले. व इतर मुलांनी आरडाओरडा करून घरी जाऊन नातेवाईक यांना कळवले.
७ वाजेच्या सुमारास सातपूर अग्निशमाक दलास समजले असता त्यांनी घटना स्थळी पाण्यात गळ टाकून मुलाचा शोधण्याचा प्रयत्न केला. यावेळी घटना स्थळी उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते अमोल पाटील, रवींद्र धिवरे यांनी जीवरक्षक संदीप गुंबाडे यांस बोलावून घेतले. गुंबाडे व इतर साथीदार यांनी पाण्यात उड्या घेऊन दोन मुलांचा शोध घेऊन वरती काढले.


