नाशिक मिरर : वृत्तसेवा
येथील श्रमिकनगर मधील सातमाऊली चौक येथे घराजवळून गेलेल्या उच्च दाबाच्या विज तारेला चिटकून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवार दि. १ सप्टेंबर रोजी दुपारी ११ वाजेच्या दरम्यान घडली.याबाबत सातपूर पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मंगेश प्रविण रहाणे ( वय २१ )असे मृत्यू झाल्याचे युवकाचे नाव आहे.मंगेश रहाणे हा सातपूर येथील जनता विद्यालयात एफ वाय बी ए चे शिक्षण घेत होता.प्रविण रहाणे यांच्या घराचे बांधकाम चालू आहे.त्याचा मुलगा मंगेश हा काही कामानिमित्त वरती गेला होता.त्याच्या घराजवळून ११०० केव्ही उच्च दाबाची वीज तार गेली आहे.तारे जवळ जाताच तो मुख्य तारेला चिटकला. या घटनेत तो गंभीररीत्या भाजला गेल्याने .त्यास नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी त्यास तपासून मृत्यू घोषित केले.या घटनेने श्रमिकनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
