नाशिक मिरर : वृत्तसेवा
सातपूर मधील राधाकृष्णनगर मध्ये बोलकर व्हॅली पोलीस चौकी जवळ आशापुरी निवास या घरात राहणारे दीपक शिरोडे (वडील वय ५५ ),मोठा मुलगा प्रसाद शिरोडे (वय २५) राकेश शिरोडे (वय २३) यांनी एकाच घरात तीन वेगवेगवेगळ्या खोलीत फॅनच्या हुकला दोरीने गळफास घेत रविवारी दुपारी तीन ते साडेतीन च्या दरम्यान घरी कुणीच नसताना आत्महत्या केली. दीपक शिरोडे हे अशोक नगर बस स्टॉप जवळ फळ विक्री व्यवसाय करतात. दरम्यान पत्नी व आई या ही दुपारी कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या,त्या घरी आल्यावर सदर प्रकार लक्षात आला.कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे.
