नाशिक मिरर :
नाशिकच्या ‘सातपूर परिसरात एका फळ विक्रेत्यांने आपल्या दोन मुलांसह सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना दि.२९ जानेवारी रोजी उघडकीस आली. सामुहिकरीत्या गळफास घेऊन आत्महत्या केल्याने संपूर्ण परिसर हादरला असून या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये २१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी १० जणांना अटक केली आहे.
दरम्यान, या प्रकरणी दीपक शिरुडे याची पत्नी प्रतिभा दीपक शिरुडे (वय ४५) यांनी सातपूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार एम. आर. धामणे, राजाराम दा. काळे, मुकेश भि. लोहार, भास्कर सोनवणे, मुकेश सोनवणे, शांताराम नागरे (रा. पिंपळगाव), संजू पाटील, शेखर पवार (दोघे रा. शिवाजीनगर), प्रकाश व्ही. गोरे, नलिनी शेलार, बाविस्कर (रा. अशोकनगर, कैलास गोन्हाणे, भूषण चौधरी, गरीब नवाज, भरत वनजी पाटील, किरण बोडके, गिरीश खटाडे, मुरली पाटील, अरुणा पाटील, आकाश इंगळे व शरद पिंगळे या २१ खासगी सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर भास्कर ओमकार सोनवणे (वय ५४ वर्षे, धंदा शेती रा, फ्लॅट नं. ८ प्रथमेश अर्पा. संभाजी — चौक श्रमिकनगर सातपूर),
संजय सज्जन पाटील (वय ४६ वर्षे धंदा – खाजगी नोकरी रा. द्वारकादिश रो. हा. नं. – आहिल्याबाई होळकर गार्डन समोर धर्माजी कॉलनी, शिवाजी नगर सातपूर नाशिक),
प्रकाश विठठ्ल गोन्हे (वय २६ वर्षे, धंदा खाजगी नोकरी राह. साई हाईटस् फ्लॅट नं. ०७– कडेपठार चौक श्रमिकनगर सातपूर नाशिक), मुकेश भास्कर सोनवणे (वय ३० वर्षे राह. फ्लॅट नं. ०८ पथमेश अर्पा, गंगासागर नगर – श्रमिकनगर सातपूर नाशिक), मुरलीधर रावण पाटील (वय ४८ वर्षे रा. शैलेश टियर रेसीडेन्सी फ्लॅट नं. ६ खुटवडनगर अंबड नाशिक,
किरण दामोदर बोडके (वय – ३१ वर्षे रा. मु. पो. पिंपळगांव बहुला ता. नाशिक) भरत वंजी पाटील (वय ४४ वर्षे राह. फ्लॅट नं. ८ दुर्गाई सोसायटी प्रगती शाळेसमोर – अशोकनगर सातपूर नाशिक, गिरीष प्रकाशचंद्र खटोड (वय ४० वर्षे राह. फ्लॅट नं. २ सम्राट वृंदावन सोसायटी औरंगाबाद नाका आडगांव नाशिक),
शरद गोविंद पिंगळे (वय ४४ वर्षे, राह. कृष्णा रोहाउस नं. ७ राधाकृष्णनगर अशोकनगर सातपूर नाशिक)शेखर सुरेश पवार (वय ३२ वर्षे धंदा खाजगी नोकरी रा रूम नं. ५ ओमकार संकुल शिवशक्ती चौक – शिवाजीनगर सातपूर नाशिक ), या जणांविरोधात आत्महत्यास प्रवृत्त करणे, धमकी व जबरदस्तीने पैसे वसूल करणे, शिवीगाळ करणे,कर्ज वसली साठी तगादा लावणे, बेकायदेशीर सावकारी करणे या गुन्हा अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक ककरण्यात आली आहे.अधिक तपास सातपूर पोलीस स्टेशन चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण, पोलीस निरीक्षक सतीश घोटेकर करीत आहेत.
नेमके काय आहे प्रकरण
सातपूरच्या राधाकृष्णनगर परिसरात राहणाऱ्या शिरोडे कुटूंबातील तिघांनी सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली. यामध्ये पित्यासह दोन सख्या भावाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याच्या घटनेने परिसरावर शोककळा पसरली आहे. दरम्यान शिरोडे पिता पुत्रांनी आत्महत्येपुर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक शिरोडे (वडील, वय 55) प्रसाद शिरोडे ( मोठा मुलगा, वय 25 व राकेश शिरोडे (वय 23) अशी आत्महत्या केलेल्या व्यक्तींची नावे आहेत. या तिघांनी एकाच घरात तीन वेगवेगळ्या खोलीत पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. शिरोडे कुटुंबीय हे मुळचे देवळा तालुक्यातील उमराणे येथील रहिवासी असून गेल्या दहा वर्षांपासून ते व्यावसायानिमित्त नाशिकमध्ये आले होते. राधाकृष्ण नगर परिसरात बोलकर व्हॅली पोलिस
चौकी समोर आशापुरा निवास या घरात ते राहत होते. वडील दीपक हे अशोकनगर शेवटचा बस स्टॉप येथील भाजी बाजार जवळ फळ विक्री करत होते, तर त्यांची मुले प्रसाद आणि राकेश चार चाकी वाहनांवर फळ विक्रीचा व्यवसाय करत होते.
आनंदावर पडले विरजण :
आत्महत्या केलेल्या प्रसाद शिरोडे यांच्या पत्नी गर्भवती असल्याने मुंबईत माहेरी गेल्या होत्या. रविवारी सकाळीच त्यांची प्रसूती होऊन त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले होते. आपल्या कुटुंबात लक्ष्मीचे आगमन झाल्याची वार्ता शिरोडे कुटुंबियांनी सगळीकडे पसरली होती. अशा आनंदाच्या प्रसंगातच त्यांनी कठोर निर्णय घेतला. त्यामुळे सातपूर परिसरात हळूहळू व्यक्त केली जात आहे.
पोलिसांना आढळली चिठ्ठी
या घटनेनंतर पोलिसांना चिट्ठी आढळून आली असून या चिठ्ठीत कर्जबाजारीपणा व सावकारी जाचला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
सातपूरच्या राधाकृष्णनगर परिसरात राहणाऱ्या शिरोडे कुटुंबातील तिघांनी सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. यात पित्यासह दोन मुलांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. यामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. एकूण 70 लाख रुपयांच्या कर्जात 31 लाख रुपये सावकारांचे कर्ज होते. वसुलीसाठी सातत्याने फोन येत होते. दरम्यान, शिरोडे पिता-पुत्रांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले.
