दिंडोरी नाशिक मिरर वेबटीम -दिंडोरी तालुक्यातील जानोरीत मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन बंद घराचे कुलूप तोडून झालेल्या चोरीत पावणे दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास झाल्याची घटना उघडकीस आली आहे याबाबत वृत्त असे की जानोरी येथील अशोक लक्ष्‍मण जाधव यांच्या दत्त मंदिरालगत असलेल्या बंद घराच्या कडी-कोयंडा मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी तोडून घरात प्रवेश करीत घरातील कपाटात ठेवलेले तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व दहा हजार रुपये रोख असा मुद्देमाल लंपास केला तसेच गावातील महाजन पेठेतील एका घराचे कुलूप तुटलेली आढळले आहे याबाबत दिंडोरी पोलीस स्टेशन येथे अशोक जाधव यांनी तक्रार दाखल केली याबाबत दिंडोरी पोलीस स्टेशन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास दिंडोरी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक अनिल कुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कल्पेश चव्हाण अरुण आव्हाड शंकर जाधव युवराज चव्हाण आदि करीत आहे

बातम्या

Don`t copy text!