जळगांव : नाशिक मिरर वेबटीम शहरातील जुन्या बस स्टँड मागील मनीष कॉम्प्लेक्समधील तिसऱ्या माळ्यावर योगेश्वर क्रीडा व सांस्कृतिक मंडळ (धरणगाव) च्या नावाखाली चालवलेल्या जुगाराचा अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून रोकडसह लाखोंचा मुद्देमाल जप्त करत ३७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर दुसऱ्या घटनेत प्रसिद्ध कोंबडी बाजारातील जेएमपी मार्केटमध्ये दलित क्रीडा संस्थामध्ये जुगार खेळत असलेल्या संशयितांवर सहाय्यक पोलिस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने सोमवारी रात्री टाकलेल्या धाडीत १३ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १ लाख ८१ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या धाडीत अनेक बड्या हस्ती सापडल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
