नाशिक मिरर : वृत्तसेवा

सातपुर कॉलनीत परवा रात्रीच्या सुमारास तब्बल सात वाहनाच्या काचा फोडून दहशत माजवण्याची धक्कादायक घटना घडली होती.यावेळी अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी माजी नगरसेवक सलीम शेख यांनी दैनिक पुढारी शी बोलताना पोलीस प्रशासनाकडे केली होती.

 

सातपुर पोलिसांनी काही तासातच आपली तपासाची चक्रे फिरवत संशशित आरोपी आकाश निवृत्ती जगताप (वय २२ रा.एम.एच.बी कॉलनी )यास ताब्यात घेतले असून आज त्याची भरदुपारी सातपुर कॉलनी परिसरात जीजामाता शाळा ते शिवनेरी गार्डन पर्यंत धिंड काढली.संशयिताने दारुच्या नशेत गाड्यांच्या काचा फोडल्याची कबुली दिली.सीसीटीव्ही कॅमेरा मुळे आरोपीला शोधण्यास यश आले.याविषयी माहिती पोलिस निरीक्षक सतिश घोटेकर यांनी दिली.

सातपूर कॉलनी परिसरातील नागरिकांनी माजी नगरसेवक सलीम शेख यांच्या पाठपुराव्याचे कौतुक करत टाळ्या वाजवून स्वागत केले.तसेच माजी नगरसेवक सलीम शेख यांनी देखील सातपुर पोलिस प्रशासनाचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.यावेळी सातपूरचे पोलिस निरीक्षक सतिश घोटेकर,पोलिस उपनिरीक्षक बाळासाहब वाघ,पोलिस हवालदार दिपक खरपडे,गोकुळ कासार,सागर गुंजाळ,संभाजी जाधव आदी डी बी पथक तसेच सातपूर पोलिस या कारवाई वेळी सहभागी होते.

मुलाने दिली कबुली :
दारूच्या नशेत असल्याने रात्री च्या वेळी कुत्रे अंगावर धावून येत होती.त्यांना हाकल्याने साठी कुत्र्याला दगड मारला, पण तो गाडीच्या काचेला लागून काच फुटली. मज्जा वाटली म्हणून रस्त्यावर असलेल्या गाड्या फोडल्या.

 

बातम्या

Don`t copy text!