नाशिक मिरर  : वृत्तसेवा

 

येथील अशोकनगर मधील भाजप कामगार मोर्चाचे सरचिटणीस विक्रम सुदाम नागरे यांच्या घरावर हल्ला करून खंडणी मागितली होती.अशी तक्रार फिर्यादी विक्रम नागरे यांनी सातपुर पो.स्टे.ला केली होती. त्यानुसार सातपूर पोलीस स्टेशन मध्ये भादवि कलम ३८४,३८६,३४१,१४३, १४७, १४९, ४२७, ५०६ सह मोक्का कलम ३(१) (II), ३(२), ३ (४), ३ (५) प्रमाणे दाखल गुन्हयातील फरार असलेले आरोपी फिरोज उर्फ बब्बू मुस्तकीस शेख यास अटक करण्यात आली आहे. अटक करणेबाबत अंकुश शिंदे पोलीस आयुक्त, चंद्रकांत खांडवी पोलीस उप आयुक्त, सोहेल शेख, सहा. पोलीस आयुक्त, अंबड विभाग, नाशिक शहर यांनी आरोपीचा शोध घेऊन अटक करण्याचे आदेश दिले होते. पोलिस निरीक्षक सतीश घोटेकर यांचे नेतृत्वात विशेष पथक पोउनि बाळासाहेब वाघ, पोना दिपक खरपडे, संभाजी जाधव, गोकुळ कासार, सागर गुंजाळ तयार करण्यात आले होते.

सदर पथकाने गुप्त सूत्रांकडून माहिती काढून संशयित आरोपी तीन महिनेंपासुन फरार असलेला फिरोज उर्फ बब्बू मुस्तकीस शेख, राह. फ्लॅट नंबर २, रेणुका रेसिडेन्सी, दत्तात्रय नगर, अमृत धाम, पंचवटी, नाशिक यास दि. १९ जानेवारी रोजी सायंकाळी ताब्यात घेऊन गुन्हयात अटक केली. व विशेष मोक्का न्यायालयात हजर केले असता, त्यास विशेष मोक्का न्यायालयाने दि.२३ जानेवारी पर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक सतिश घोटेकर, प्रभारी अधिकारी, सातपुर पो.स्टे बाळासाहेब वाघ, पोना दिपक खरपडे, संभाजी जाधव, गोकुळ कासार, सागर गुंजाळ यांनी केली असुन नागरीकांनी या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

बातम्या

Don`t copy text!