नाशिक मिरर वृत्तसेवा :

 

शहरातील गुन्हेगारी काही केल्या कमी होण्यास तयार नसून, दिवसाआड खुनाचे सत्र सुरू आहे. नाशिकरोड भागात सराईत गुन्हेगाराची हत्या होऊन दोन दिवसही उलटत नाही तोच दि. ५ मे आज पहाटे सातपुरच्या प्रबुद्धनगर येथे संजय पुंडलिक जाधव वय ४८रा. अशोकनगर या व्यक्तीची तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

 

गेल्या आठवड्यातच अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामटवाडे परिसरात एका १७ वर्षीय तरुणाच्या खुनाची घटना घडली होती. नाशिक शहरात दिवसेंदिवस वाढत्या खुनाच्या घटनेमुळे नाशिककर पुरते भयभीत झाले आहेत

सातपुर परिसरातील प्रबुद्ध नगरात ४८ वर्षीय इसमाचा मध्यरात्रीच्या सुमारास खुन झाल्याची माहिती सातपुर पोलिसांना मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असुन याप्रकरणी अनिल गांगुर्डे व अमित जाधव वय २७ वर्ष रा. सातमाऊली चौक श्रमिकनगर या दोन संशयितास ताब्यात घेतले असून पोलीस त्याची चौकशी करत असल्याचे सातपुर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजीत नलावडे यांनी सांगितले याबाबत प्रबुद्ध नगरात परीसरात मध्यरात्रीच्या सुमारास ४८ वर्षेीय मृतावस्थेत पडलेला होता.मृत व्यक्ति सीएट कंपनी मधील कामगार होता. रात्र असल्याने हा प्रकार कुणाला कळला नाही परंतु दिवस उजाडल्या नंतर येणाऱ्या जाणा-यांच्या नजरेत ही घटना पडल्या नंतर परिसरातील नागरिकांनी सातपुर पोलिसांना कळवली त्यानंतर पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असुन तसेच यावेळी पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख हे देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहे दरम्यान या प्रकरणी दोन संशयिताला ताब्यात घेतले असून सातपुर पोलिस अधिक तपास करत आहेत.

बातम्या

Don`t copy text!