नाशिक मिरर वृत्तसेवा :

परमपूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणीत सहज योग ध्यान साधनेचा दिव्य प्रवाह आज जगभरात 150 हून अधिक देशांमध्ये पसरलेला असून, या योग पद्धतीकडे मानवाच्या सर्वांगीण कल्याणाच्या दिशेने वाटचाल करणारा अद्वितीय मार्ग म्हणून पाहिले जाते. ध्यानाच्या माध्यमातून व्यक्ती आपल्या अंतर्मनातील परमेश्वरी शक्तीला जागृत करून तिचा सर्वव्यापी शक्तीशी संबंध प्रस्थापित करतो. या दिव्य अनुभूतीतून साधकाच्या हातांवर व टाळू भागावर सूक्ष्म जाणीवा निर्माण होतात.

 

सहज योग ध्यानाची ही अनुभूती केवळ आध्यात्मिक नाही, तर मानसिक आणि शारीरिक आरोग्याला समृद्ध करणारी आहे. श्री माताजींच्या कृपेने या ध्यानसाधनेमुळे आधुनिक जीवनातील ताणतणाव, चिंता, अशांती यापासून दूर राहत आनंदी व समाधानी जीवन जगता येते.

 

या चैतन्यमय साधनेचा प्रत्यक्ष अनुभव देणाऱ्या “आत्मसाक्षात्कार सोहळ्या” चे आयोजन सहजयोग परिवार, नाशिक यांच्या वतीने दि. ३ मे २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वा. जिजामाता हायस्कूल प्रांगण, सातपूर कॉलनी, नाशिक येथे करण्यात आले आहे.

 

या कार्यक्रमात सहजयोग ध्यानाची माहिती, प्रत्यक्ष आत्मसाक्षात्काराचा अनुभव आणि दिव्य शक्तीशी नातं जोडण्याची अनोखी संधी साधकांना मिळणार आहे. नवसाधकांसाठी देखील हे कार्यक्रम मार्गदर्शक आणि जीवनामध्ये स्थैर्य प्राप्त करून देणारे ठरतात.

 

सर्व नाशिककर नागरिकांना, विशेषतः शांती, समाधान आणि सकारात्मक जीवनशैलीचा शोध घेणाऱ्या व्यक्तींना या भव्य दिव्य कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे सहजयोग परिवाराच्या वतीने विनम्र आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या

Don`t copy text!